prabodhini news logo
Home कोरची महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय आश्रम शाळा कोरची येथे उत्साहात झेंडावंदन

महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय आश्रम शाळा कोरची येथे उत्साहात झेंडावंदन

0
167

कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – कोरची येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या पटांगणात १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल ऊईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानिमित्ताने शाळेचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला असून इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचा शंभर टक्के निकाल लागल्याची आनंददायी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले.
सत्र २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परिसरातील ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळांना भेट देऊन “आपल्या पाल्यांना आश्रम शाळेत शिक्षणासाठी प्रवेश द्या” असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे कर्मचारी हरेश कामडी, मनोज गजभिये, अरुण कायंदे, प्रमोद शंभरकर, अभिमन्यू वाटगुरे, राहुल अंधारे, धनश्री परतेती, भैयालाल कुरसंगे, कृष्णा गावळे, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन, अमित मेश्राम, संतोष सहारे, डाकराम ठाकरे, गीता राऊत, सुषमा अंबोणे, मनोज आचार्य, चंद्रकांता पटले, प्रिती खंडाते, सुधाकर पुसाम, भारती साखरे, भुमेश शेंडे, ओमप्रकाश रहिले, सीमा कुरेकार, ढेंगळे, प्रथमेश पाटोळे, राजू बोगा, राजू मेश्राम, अश्वले साखरकर, पुसाम तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
शंभर टक्के निकाल व प्रवेश अभियानामुळे शाळेच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here