prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपुरीत काँग्रेस कमिटीकडून बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

ब्रम्हपुरीत काँग्रेस कमिटीकडून बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

0
58

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपुरी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची होती.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या स्थापनेच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला, तर कामगार दिनानिमित्त देशाच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या कामगारांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून भगवान बुद्ध यांच्या समता, बंधुता व शांततेच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच महाराष्ट्राच्या विकासात सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांचे योगदान अनमोल असल्याचे नमूद करत त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देण्याची गरज व्यक्त केली.

या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगराध्यक्ष योगेश मिसार, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जिल्हा काँग्रेस सचिव वासुभाऊ सोंदरकर, नगरसेवक राकेश पडोळे, नगरसेवक पुष्पाकर बांगरे, नगरसेवक वकार खान, कृउबा संचालक अरुण अलोने, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष मुन्ना रामटेके, इकबाल जेसानी, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, जिल्हा काँग्रेस सहसचिव गाजी पटेल, दलितमित्र प्रा. डी. के. मेश्राम, राममोहन ब्राडीया, माजी नगरसेवक जगदीश आमले, कृउबा संचालक ज्ञानेश्वर झरकर, सुधीर शिवरकर, शहर काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल विखार, मुरहारी मेश्राम, सुरेश वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सामाजिक एकात्मता, प्रगती आणि कामगारांच्या सन्मानासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here