
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रवीण खोब्रागडे, देशक खोब्रागडे, प्रेरणा करमरकर, अशोक टेंभरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर किशोर तेलतुंबडे, अशोक फुलझेले, दिलीप डांगे, अनंता बाबारे, राजकुमार जवादे, प्रतीक डोर्लीकर, अॅड. राजस खोब्रागडे, आनंद वनकर यांच्या हस्ते धम्मध्वज दाखवून धम्मक्रांती बाईक रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. ही रॅली जटपूरा गेट मार्गे फिरून पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आली. या रॅलीत शेकडो उपासक-उपासिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात ज्येष्ठ धम्मप्रचारक इंजि. शेषराव सहारे यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. यावेळी मंचावर प्रा. डॉ. उषा खोब्रागडे, गीता रामटेके, निर्मला नगराळे, उमाकांत घोडेस्वर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कैलास शेंडे यांनी केले.
सायंकाळी आयोजित मुख्य प्रबोधन कार्यक्रमात “जागतिक असांत्यतेवर उपाय – बुद्धाचा उपदेश” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत अशोक निमगडे होते. तसेच सपना कुंभारे (महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मानित) व भाऊराव दुर्योधन (धम्मरत्न पुरस्कार सन्मानित) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता बेताल, प्रास्ताविक अनिता जोगे तर आभार प्रदर्शन वर्षा घडसे यांनी केले.
यानंतर युवक-युवतींसाठी बुद्ध-भीम गीतांवर आधारित सामूहिक व एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली. विविध वार्डांतील बौद्ध मंडळांच्या स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांची छाप पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचफुला वेलेकर, महादेव कांबळे, केशवराव रामटेके, नम्रता रायपुरे, हर्षल खोब्रागडे, ज्योती शिवणकर, शंकरराव वेलेकर, ज्योती सहारे, बुद्धप्रकाश वाघमारे, अनिल खोब्रागडे, जमनादास मोटघरे, वैशाली साठे, सुनील साव, गोवर्धन डोंगरे, सचिन पाटील, आम्रपाली मेश्राम, शीला कोले, संगीता घोडेस्वार, प्रीती लभाने, प्रियांका बाबरे, पौर्णिमा जुल्मे, लीना खोब्रागडे, प्रा. डॉ. टी. डी. कोसे, हरिदास देवगडे, युगांन डवले, सिद्धार्थ शेंडे, राजूभाऊ खोब्रागडे, सुभानकुल खोब्रागडे, पवन तेलंग, प्रणित तोडे, रुपेश वालकोंडे, नकुल कांबळे, सक्षम पाथर्डी, अभिजीत तोतडे, सुरभी मोडक, संजना झाडे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामुळे चंद्रपूर शहरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.















