prabodhini news logo
Home चंद्रपूर भद्रावतीत युवासेनेची दमदार बैठक; BLA नेमणुकीसाठी रणशिंग फुंकले!

भद्रावतीत युवासेनेची दमदार बैठक; BLA नेमणुकीसाठी रणशिंग फुंकले!

0
40

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – भद्रावती : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दिनांक १ मे २०२६ रोजी भद्रावती येथील हॉटेल Sunny Point येथे युवासेनेच्या वतीने BLA (Booth Level Agent) नेमणुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व उत्साहपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य तथा युवासेना चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख मा. हर्षल शिंदे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी BLA नेमणूक ही अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संघटन अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मा. आलेख रट्टे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी स्थानिक स्तरावर संघटन वाढीसाठी ठोस दिशा देत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

बैठकीस युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुनेश्वर बदखल, युवासेना शहर प्रमुख राज चव्हाण, तालुका प्रमुख महेंद्र भोयर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान BLA नेमणुकीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात येऊन पुढील रणनीती निश्चित करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवासैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने संघटनात्मक बळकटीचे प्रभावी दर्शन घडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here