
दऱ्या खोऱ्यात हिंडून मिळतो
उनाड अल्लड बेफाम वारा
दुर्गम किल्ल्यात जाण्यासाठी
वाट पाहती आमुच्या नजरा
अनेक नद्या जिथे वाहती
शिवरायांचे स्वप्न बघती
प्राणी पक्षी किलबिल करती
वासुदेव मंजुळ गाणी गाती
महान आत्मे जिथे जन्मले
कलाकारांचे कलाकेंद्र बनले
नेत्यांनीही जीवन अर्पियले
महाराष्ट्र जनक जे जाहले
सह्याद्रीच्या कुशीत वसले
भीमथडीच्या किनारी बसले
शेतकऱ्यांना सकलांचे नमन
कृषी क्षेत्रात नामांकित जाहले
अभिमानाने मराठी भाषा बोलू
वारकरी अभिमानाने जाती पंढरीला
आज नमन त्या जगनियंत्याला
गीत गाऊन वंदूया महाराष्ट्राला
(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड, पुणे















