prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

0
62

दिला विश्वबंधुत्वाचा संदेश
एकात्मतेचे प्रबोधन करून
आत्मसंयमनाचे विचार मांडले
त्यांनी ग्रामगीता काव्यातून

विठ्ठलभक्त संत तुकडोजीनी
भजन कीर्तनाच्या माध्यमातून
अंधश्रद्धा ,जातीभेद निर्मूलन
केले प्रबोधन खंजिरी भजनातून

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी
समाज सुधारणेचा घेऊनी वसा
गुरुकुंज आश्रमाची केली स्थापना
रुजवुनी मनीं देशभक्तीचा ठसा

सामाजिक कार्य ,राष्ट्रप्रेम पाहून
राष्ट्रपतींनी दिली पदवी राष्ट्रसंत
भजने अभंग ओव्या रचून
जनमानसात झाले महान संत

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात
सक्रिय सहभाग घेऊनी
तुकडोजी वसले मनामनात
दिन दुबळ्यांची सेवा करुनी

सौ.वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here