prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बुद्धपौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बुद्धपौर्णिमा

0
49

आज बुद्धपौर्णिमा फुले मनात चांदण
कपिलवस्तू देवदह लुंबिनीचे शालवन,
रवीबिंब प्राचीवरी उषेसह करी आगमन
चंद्रमाही मंद मंद पश्चिमेस करी गमन
मंद शीतल वायूवर करी भ्रमण विहंगम
आज बुद्धपौर्णिमा…
ऐश्वर्य भूमातेचे उमटली पावले
बाल सिद्धार्थ जन्मताच कृतार्थ जन झाले
धन्य झाली वसुंधरा सिद्धार्थाच्या स्पर्शानं
आज बुद्धपौर्णिमा…
गंधित पारिजात मोहमयि बकुळ फुलं
शेवंती गुलाबही निशिगंध निळकमल
आसमंत बहुरून ये सृष्टीचे सम्मेलन
आज बुद्धपौर्णिमा…
निर्मल मंगल वातावरणी
पवित्र ऋतू अवतरला
सनई चौघडे नगारा ही दुमदुमला
धन्य झाली कपिलवस्तू आनंदले नगरजन
आज बुद्धपौर्णिमा…
जगामध्ये बुद्धाचा जन्म अलौकिक
दिव्यदृष्टी प्रज्ञा करूणेचा प्रशासक
महापरिनिर्वाण पदीही ठरला मार्गदर्शक
शांती सुखाचे दुख दूर करणण्याचा
दिला मार्ग मध्यम
आज बुद्धपौर्णिमा…

Nirmala Borkar
Nagpur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here