prabodhini news logo
Home ठळक बातम्या लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा...

लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा

0
48

नांदेड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये मागील ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा ध्वज पाच दिवसांच्या आत पुनर्स्थापित करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी दिला आहे.

लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे बौद्ध बांधवांच्या वतीने मागील 32 वर्षापासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व बुद्ध जयंती निमित्ताने तेथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व अभिवादन करण्यात येत होते. पण काही दिवसापूर्वी काही समाज नाटकांनी रातोराज पंचशील ध्वज व विश्र्वशांती बौध्द विहार यांच्या नियोजित जागेचा नाम फलक काढण्यात आला. त्यामुळे शहरात बौद्ध बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे 5 दिवसाच्या आत पंचशील ध्वज पुनर्स्थापित करून ध्वज काढण्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 189 कायद्याने गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत केले होते. यावेळी त्यांनी पाच दिवसाचा अल्टीमेट प्रशसनाला दिला.

यावेळी बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, जिल्हा महासचिव रव‍ि पंडित, प्रशांत गोडबोले, माजी नगरसेवक पंचशि कांबळे, जयपाल ढवळे, रंगनाथ गजले, गणपत सवयी, सोना कांबळे, नामदेव पांचाळ, संतोष भावे, छगन हटकर, मोहन सोनकांबळे, सुभाष खाडे, करण साबळे, शेषराव हंकारे, सचिन नवघडे, गोविंद सोनवळे, बाळासाहेब खिल्लारे, अविनाश कांबे, सारनाथ जोंधळे, निवृत्ती तिगोटे, डॉ.रामचंद्र वनंजे सह मोठया संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व बौध्द बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here