
संकेत पा. बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये अतिशय कर्तव्यदक्ष असणारे पी. एस. आय. चव्हाण साहेब आज सेवानिवृत्त झाले आहे,
त्यांच्या कार्यकिर्ती मध्ये त्यांनी शांतता सुव्यवस्था टिकून ठेवली तालुक्यातील गुन्हेगारीवर त्यांच्या सतत वचक राहिला आहे त्यामुळे तालुक्यात शांतता प्रस्थापित झाली आहे शिस्तप्रिय असल्यामुळे त्यांचे एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली होती. पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी व पोलीस, मित्र, पत्रकार, संघटना, आदींनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ चे वतीने त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना व त्यांच्या बद्दल दोन शब्द बोलातना जगन बापूसाहेब ताकटे जनता महाविद्यालय साक्री चेअरमन श्री संजय आबा नेत कर आणि श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांनी स्वागत केले आहे,या वेळी धुळे जिल्हा एस. पी. साहेब, बारकुंड साहेब आणि पोलिस अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. एस. पी. साहेब यांच्या उपस्थितीत चव्हाण साहेब यांना शुभेच्छा देताना धुळे जिल्हा अध्यक्ष जगन बापूसाहेब ताकटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील आयुष्य सुखात समाधानात जावो अशी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली.














