
किशन बी पवार
तालुका प्रतिनिधी माजलगाव
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
9421768686
माजलगाव दि.03.06.2023. माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील महादेव कुठे यांना विम्यातून दीड लाखाचा धनादेश मिळाला माजलगाव येथील बप्पा श्री अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेचे कर्जदार महादेव कुठे यांनी तीन लाखाचे कर्ज घेतले होते दुर्दैवाने त्यांचा तीन महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला त्या कुटुंबासमोर करता पुरुष दगावल्याने आता कर्ज कसे फेडणार असा प्रश्न होता परंतु कर्जदार महादेव कुठे यांनी विमा उतरला होता त्यांची तीन लाख विम्यातून मिळाले त्यातील बँक कर्ज एक लाख 44 हजाराचे कर्ज माफ करून व उर्वरित कुटुंबाला एक लाख 56 हजार मिळाले कारण त्यांनी मृत्यू होण्याअगोदर आपला विमा काढला होता त्यामुळे बँकेचे कर्ज घेतलेले असताना विमा मिळाला म्हणून कर्ज परतफेड केली भाटवडगाव येथील महादेव गोवर्धन कुटे वय वर्षे 35 यांनी 2021 मध्ये व्यवसायाकरिता कर्ज घेतले होते त्यातील बँकेचे कर्ज एक लाख 44 हजार होते ते कपात करून उरलेली रक्कम एक लाख 56 हजार चा धनादेश परत करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली व एक मुलगा अनुक्रमांक सात .पाच. तीन. व एक. वर्षाचे आपत्ती आहेत कर्जापोटी थकीत एक लाख 44 हजार कपात एक लाख 56 हजार रुपयांचा धनादेश माजी सरपंच गीताराम अनभुले यांचे हस्ते मयत महादेव कुटे यांच्या पत्नी भाग्यश्री कुटे व वडील गोवर्धन कुटे यांच्याकडे सपूर्त करण्यात आला माजी सरपंच गीताराम अनभुले यांचे गावकऱ्यांनी आभार मानले.














