prabodhini news logo
Home ठळक बातम्या कामगारांच्या सुरक्षे बाबत कर्नाटक एम्टा कंपनीचा भोंगळ कारभार

कामगारांच्या सुरक्षे बाबत कर्नाटक एम्टा कंपनीचा भोंगळ कारभार

0
49

स्वप्निल रा. मोहितकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

भद्रावती – कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा टिप्पर ने टाकण्यात येणाऱ्या मातीच्या ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला मध्यरात्री घडली या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी त्या टिप्पर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
http://www.prabodhininews.com/?p=26319
विनोद बरडे वय ४५ वर्ष राहणार बरांज असे या कामगाराचे नाव आहे. कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत आर टी एम या कंपनीला मातीचे उत्खनन करण्याचे काम दिले आहे. हा कामगार तिथे वाहनाला दिशा दाखवण्याचे काम करत होता घटनेच्या दिवशी तो कर्तव्यावर असताना एका टिप्पर चारकाने तो उभा असलेल्या जागेवर मातीचा ढिगारा टाकल्याने त्यात तो दबला गेला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती पहाटे भद्रावती पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी ठाणेदार बिपिन इंगळे यांनी घटनेची माहिती घेतली घटनास्थळी कामगार नेत्यांनी मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक मोबदला द्यावा याकरिता घेराव घेतला होता त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला व यातील आरोपी टिप्पर चालक याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे. पुन्हा एकदा या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षे बाबत कर्माटक एम्टा कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
http://www.prabodhininews.com/?p=26322

http://www.prabodhininews.com/?p=26325

http://www.prabodhininews.com/?p=26328

http://www.prabodhininews.com/?p=26315

http://www.prabodhininews.com/?p=26312

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here