prabodhini news logo
Home ठळक बातम्या इंदिरानगर परिसरात पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा येथील मुलांचे भविष्य...

इंदिरानगर परिसरात पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा येथील मुलांचे भविष्य अंधारात

0
62

प्रेरणा निमसटकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर येथील इंदिरानगर परिसरात पंडित जवाहरलाल नेहरू सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा येथील मुलांचे भविष्य अंधकार मध्ये कारण की शाळेत 270 मुलांना शिकवण्याकरता पाच शिक्षक त्यामध्ये तीन शिक्षक महानगरच्या कामाकरता जात असतात. प्रिन्सिपल सर आणि एक शिक्षक शाळा सांभाळतात. शाळेमध्ये फॅन बंद पडलेले आहेत. शाळेचे छत गळत असतो. पाण्याची सुविधा नाही. संडास बाथरूम पडण्याच्या मार्गावर आलेले आहे. असे अनेक असूविधा पासून गोरगरिबांचे मुलांना वंचित ठेवले जात आहे इथले प्रशासकीय अधिकारी व इथले पालकमंत्री ह्या मुलांचे भविष्य अंधकारात टाकण्याचे काम करत आहे. चंद्रपूरच्या दाताळा पुलाच्या रोशनाई करता कोणीही मागणी न करता करोडो रुपये खर्च केल्या जातात, ही कुठली न्यायव्यवस्था आहे. गेल्या दहा वर्षापासून माझी नगरसेवक या शाळेच्या पाचशे मीटरच्या अंतरावर राहत असतात तरीसुद्धा इथल्या नगरसेवकांनी या शाळे च्या व्यवस्थेबद्दल पाहणी केली असते तर ही परिस्थिती आपल्या गोरगरिबाच्या मुलांच्या भविष्यासोबत धोका झाला नसता. फक्त इथले नगरसेवक आमदार व खासदार बनण्याचे स्वप्न बघत असतात. एकीकडे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार जिल्हा परिषद शाळांना कॉन्व्हेंट दर्जाचे उच्च प्रशिक्षण देण्याचे काम केजरीवाल सरकार करत आहे ते आपल्याला शिकण्यासारखा आहे. यापुढे महाराष्ट्रात सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक लढणार आहे. गरिबांचे मूलभूत हक्क सुख सुविधा मिळवून देण्याकरता आम आदमी पार्टी सदैव तत्पर्य राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here