
राकेश कारंडे
तालुका प्रतिनिधी, साक्री
प्रबोधिनी न्युज
साक्री – दि. ८ जुलै रोजी साक्री रोड येथील समारोह मंगल कार्यालय समोर नॅशनल वे ब्रिज च्या शेजारी पाण्याचा वॉल असून हा वॉल नॅशनल वे ब्रिज च्या मालकाने त्यांच्या येथे येणारे मालट्रक व ताडपत्री धुण्यासाठी वॉल फोडून सर्रासपणे वापर करीत आहे.
एकीकडे धुळेकर जनतेला आठ दिवसा नंतर पाणी दिले जाते. अनेक आंदोलन होऊन देखील आंदोलनाची दखल घेतली जात नाही आणि त्यात नॅशनल वे ब्रिज चे मालक वॉल फोडून पाणी गाड्या धुण्यासाठी वापरून लाखो लिटर पाणी वाया घालवतो आहे त्या वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन धुळे जिल्हा अध्यक्ष दिनेश राज निकुंभ यांच्या हस्ते सहाय्यक आयुक्त सनेर साहेब यांना देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आंबेडकर गटाचे धुळे जिल्हा अध्यक्ष दिनेश राज निकुंभ, आय टी सेल प्रमुख सनी सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख महेश खैरनार, युवक शहर अध्यक्ष स्वप्निल मोहिते , किशोर कुवर, विनोद वाघ उपस्थित होते.














