
किशन बी पवार
तालुका प्रतिनिधी माजलगाव
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
मोबाईल नंबर 9421768686.
माजलगाव दि.09.07.2023. माजलगाव शहर येथे मोटरसायकल चोरी गुन्हा दाखल. रजिस्टर नंबर.223/2023 कलम 379 भा.द वी. प्रमाणे दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तपास करून निष्पन्न केले की नमूदगुण्यातील मोटरसायकल ही इसम नामे सचिन रामेश्वर स्वामी वय वर्षे 32 राहणार लवूळ नंबर एक तालुका माजलगाव व संजय रामेश्वर चाळक वय वर्षे 25 राहणार साईनगर माजलगाव यांनी चोरी केली आहे पोलिसांनी दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीच्या एकूण बारा मोटरसायकली जप्त केल्या आहेत माजलगाव गेवराई आणि गंगाखेड इथून या गाड्या चोरी गेल्या होत्या ज्या मोटरसायकलचे स्वीच जुने झाले आहेत ज्या व्यवस्थित लॉक केल्या नाहीत त्याच गाड्या पाळत ठेवून चोरटे चोरत असल्याचे चोरट्याकडून समजले पोलिसांकडून आव्हान करण्यात येते की लोकांनी आपले वाहणे सुरक्षित ठिकाणी पार्क करावेत शक्य तेवडे समोरच्या चाकाचे चे लॉक लावावे आपल्या वाहनाची काळजी घ्यावी चोरावर घालण्यासाठी अशा डोळ्यांची माहिती काढून त्यांचे विरुद्ध प्रस्थापित कायद्याने कारवाई करावी अशी सूचना यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या होत्या ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर पवार सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांचे मार्गदर्शन प्रमाणे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे पोलीस जमादार गणेश तळेकर पोलीस अमलदार महेश चव्हाण पोलीस अमलदार सहादू कोकाटे यांनी केले आहे..














