
प्रेरणा निमसटकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूर: माणिक पेटकर हा नावाचा व्यकी व्यक्ती ४ दिवसा अगोदर सिग्नल वर बेशुद्ध अवस्तेत होता.त्याला माणुसकी फाऊंडेशन टीम ने उचलून त्याला स्वच्छ करून कपडे लाऊन दिले व उपचाराकरिता सरकारी हॉस्पिटला मध्ये भरती करून त्याचे सगळे टेस्ट, एक्स रे, सिटी स्कॅन, करून सलाईन औषध सुरु करून त्यांचे चांगले उपचार सुरू ठेवले सोबतच त्याचा घरच्यांचा शोध घेण्यास सुरुवात करून दिनांक 7/07/2023 रोजी त्यांचा परिवाराचा पत्ता मिळाला. त्यांना हॉस्पीटला नेऊन त्याचा परिवारास एक मेकांना भेटवून दिले. या कार्यास त्याच्या परिवारातील सदस्यांनी माणुसकी फाउंडेशनचे आभार मानले आणि भविष्यात असेच प्रगती करण्याकरिता शुभकामना सुद्धा देण्यात आले. या कार्यात विशेष सहकार्य PSI सामलवार सर व त्यांची टीम, डॉक्टर भास्कर झलके, राठोड आणि चौधरी सर, मून मॅडम, डॉक्टर कुमारी धर्मशीला मॅडम , GOV.हॉस्पिटल कॉन्स्टेबल बारेकर सर, राहुल सूर्यवंशी, या सर्वांचा वेळोवेळी टीमला सहकार्य लाभले.
ज्यांचा अतिशय मेहनतीने हे काम पुर्ण झाले असे माणुसकी फाउंडेशन चे सदस्य विशाल रामगीरवार, सुशांत धकाते,सागर ढोरे, राजू कुडे, विनोद पेन्लीवार, जास्मिन शेख,स्नेहा पुडके(ढोरे), नंदकिशोर बहुलकर सुरज बीटे यांनी अतिशय परिश्रम घेतले.














