prabodhini news logo
Home राजकीय आप महाराष्ट्र राज्य संघटन सचीव पदी निवड झाल्याबद्दल अँड अजीत खोत यांचा...

आप महाराष्ट्र राज्य संघटन सचीव पदी निवड झाल्याबद्दल अँड अजीत खोत यांचा सत्कार

0
72

वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

उस्मानाबाद- आम आदमी पार्टी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी वतीने अँड अजीत (अण्णा) खोत यांची नुकतेच आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटन सचीव पदी निवड झाली आहे त्यामुळे आम आदमी पार्टी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी वनीने आम आदमी पार्टी उस्मानाबाद येथील जिल्हा कार्यालयात सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या वतीने अँड. अजीत खोत यांचा मोठ्या उत्साहाने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देउन सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .
अँड. अजीत खोत यांच्या सक्षम नेतृत्वात आम आदमी पार्टीची कावळे वाडी ता. ज. उस्मानाबाद येथे ग्रामपंचायत असुन दुसर्यांदा ग्रामपंचायत निवडुन आणली आहे व ते विद्यमान सरपंच आहेत तसेच त्यांनी आम आदमी पार्टी मराठवाडा पद प्रभावीपणे पार पाडले असुन जिल्हा व परिसरात त्यांचा दांडगा संपर्क आहे, त्यांच्या कार्याची दखल घेउनच आमआदमी पार्टी ने त्यांची महाराष्ट्र राज्य संघटन सचीव पदी निवड केली असुन पक्ष बांधणी अधिक मजबुत होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here