
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते योगेश धानोरकर यांना युवक राष्ट्रवादी काँगेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केल्याबाबतचे पत्र युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिले.
यावेळी आमदार इंद्रनील नाईक आवर्जून उपस्थित होते. योगेश धानोरकर यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश संघटक म्हणून या आधी काम केलेले आहे. मागील अनेक वर्षापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यरत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य असून, जिल्हाभऱ्यात मोठया संख्येने जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांनी जोडलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही संधी मिळाली आहे.
या निवडीचे श्रेय योगेश धानोरकर यांनी, लोकप्रिय नेते माजी मंत्री मनोहरराव नाईक साहेब, आमदार इंद्रनील नाईक साहेब,माजी आ. ख्वाजा बेग साहेब, प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील , महिला रा.कॉ.प्रदेश सरचिटणीस क्रांतीताई राऊत (धोटे), युवा नेते तारिकभाई लोखंडवाला, लाला राऊत यांना दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर नियुक्ती पत्र घेतांना विराज घुईखेडकर, गुणवंत सूर्यवंशी, कृष्णकुमार राठोड, प्रमोद राजगुरू,पंकज राठोड, प्रकाश राठोड, सुनील ढाले, बबलू जाधव, झाकीर राज, अवि पाटील यादवकुळे, शंकर कदम, नयन लुंगे, आकाश चंदनखेडे, अमन चौधरी सह अनेक युवक उपस्थित होते.














