
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
अमरावती
अमरावती : जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) शहरात वाहन चोरी,पैसे चोरी,दागिने चोरी,मोबाईल चोरी अशा अनेक प्रकारच्या चोरीच्या घटना आपण सर्वांनी ऐकल्या असतील परंतु मशानभूमी चोरीची घटना पहिल्यांदाच ऐकली असेल.
गेल्या 2 वर्षपूर्वी अंजनगाव सुर्जी शहरातील जुना बस स्थानक जवळील हिंदू मशानभूमीच्या कंपाउंड ग्रील चोरीची घटना वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती.परंतु त्यावर नगरपरिषद कार्यालयाने कुठलीही कारवाही केली नसून चोराला चोरीचे पाठबळ मिळण्यामागे प्रशासनाचा हात तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.कारण चोरीच्या घटनेची पुनरावृत्ती जनतेसमोर आज दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी पुन्हा उघडतीस आल्याची दिसून येत आहे.आतातर चक्क प्रेत जाळण्यासाठी उभारलेले कटघरे चोरांनी चोरून नेले.वारंवार होणाऱ्या अश्या चोरीमुळे अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असून नगरपरिषद द्वारे रीतसर कारवाही करावी आणि प्रेतावरच्या लोणी खाणाऱ्या चोराला अटक व्हावी अशी जनतेत चर्चा ऐकण्यात येत आहे.














