देवराव कोंडेकर यांचा विविध उपक्रमांने वाढदिवस साजरा

0
45

वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर – चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे कर्मचारी देवराव कोंडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. कोंडेकर यांचा वाढदिवस दरवर्षी गरजू व्यक्तीला मदत करून व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो यावर्षीही विद्यामंदिर हायस्कुल ऊर्जानगर येथे दुर्गापूरच्या गरजू विद्यार्थ्यांना बुक व पेन वितरण करण्यात आले तसेच वाढंरी येथील अनाथालयातील विद्यार्थ्यांना खाऊ व बुक पेनचे आणि बुद्धिष्ट फाउंडेशनच्या वतीने धान्याचे वितरण करण्यात आले.

तसेच शिवभोजन केंद्र तुकुम येथे लाभार्थ्याला मिठाईचे वितरण करण्यात आले आणि चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात गरजूंना स्व:च्छेने रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. देवराव कोंडेकर हे विविध सामाजिक संस्थेशी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विकलांग सेवा संस्था, मराठा सेवा संघ, नाते आपुलकीचे, मनसे वीज कामगार सेना तसेच अशासकीय सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती चंद्रपूर,विशेष कार्यकारी अधिकारी असे सामाजिक बांधिलकी जोपासत असून अनेक पद ही भूषविले आहे.त्यांना या कार्याची दखल घेऊन विविध पुरस्कार व सन्मानही मिळाले आहेत त्यांचा नेहमी सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग असतो अशा कर्तृत्वान कार्यकर्त्यांस त्यांच्या कार्यास भरभरून शुभेच्छा सुरेश केसरकर, बंडोपंत बोढेकर, नरेंद्र रहाटे, राजीराम भजनकर, अशोक खाडे, नितीन राव, सुजित जुनगरे,राजा वेमुला,नारायण चव्हाण, बबन माहुलीकर, श्रीराम पान्हेरकर द्वारा देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here