कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची काळी दिवाळी – राजेश शंकर चेड़गुलवार

0
104

आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा तथा महानगर चे समर्थन

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपुर : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती यांची सरसकट समायोजन करा आणि समान काम समान वेतन दया या मागणीला घेऊन कंत्राटी कर्मचारी यांचे मागील अनेक दिवसांपासून आंदोलन चालू आहे. या आंदोलनास आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा तथा महानगर कमिटीच्या पदाधिकाऱ्यानी भेट दिली व त्यांच्या समस्या समजून घेतले व सुरु असलेल्या आंदोलनाला मुख्य समन्वयक रविंद्र उमाठे यांना समर्थन पत्र देण्यात आले.

आरोग्य विभागात काम करणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसापासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काम करण्याऱ्या अनेक शासकीय अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा व्याप आल्याने त्याचा परिणाम सामान्य जनतेवर पडत असून अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे.
ऐन दिवाळी च्या दिवसात छोट्या छोट्या मागण्या घेऊन आरोग्य सेवा देणारे अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे.  त्यांची मागणी ही रास्त असून गेल्या 18 वर्षा पासून ते कंत्राटी म्हणुन कार्यरत आहे. समायोजन सोबत समान काम समान वेतन देण्यात यावे कारण काम सारखे , पद सारखे पन दाम कमी आहे. समर्थन देताना आप सोशल मीडिया हेड राजेश शंकर चेडगुलवार यांनी समायोजन ला होत असलेल्या विलंबाला तीव्र रोष व्यक्त केले आहे.

एडवोकेट तब्बसुम शेख यानी सांगितले की कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात अविरत सेवा दिली. पन सरकार ला आरोग्य कर्मचारियांचे दुःख दिसत नाही की ते दुर्लक्ष करीत आहे कळत नाही. महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यानी सांगितले की दिल्ली आणि पंजाब मध्ये कंत्राटी कर्मचारी यांना कायम सेवेत केले असून महाराष्ट्र सरकार का बर करू शकत नाही अश्या खड्या बोल शब्दात रोष व्यक्त केला. अश्या ह्या कोरोना योद्धांच्या समस्यांचे प्रशासनाने तातडिने निराकरण करून त्यांच्या रास्त असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण करावे, व पूर्ववत त्यांना कामावर घेऊन आरोग्य यंत्रणा सुरळीत चालू करण्यात यावी व सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या गैरसोयीतून मुक्तता देण्यात यावी अन्यथा जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतीने आगामी हिवाळी अधिवेशन मध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांना घेऊन तीव्र मोर्चा काढण्यात येईल असे या वेळी महानगर अध्यक्ष यांनी सांगितले. यावेळी राजू कुडे युवा जिल्हा अध्यक्ष, संतोष बोपचे महानगर युवा अध्यक्ष, तब्बसूम शेख महानगर महिला सदस्य, सुनील सदभय्या महानगर उपाध्यक्ष, स्वप्नील घागरगुंडे महानगर कोषाध्यक्ष, सुधीर पाटील महानगर सहसचिव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here