
माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
ब्रम्हपुरी प्रतिनिधि
प्रबोधिनी न्युज
तालुक्यातील मुई येथे खास दीपावलीच्या शुभ पर्वावर नवयुवक बाल गणेश मंडळ तथा जय जवान जय किसान मंडळ मुई यांच्या वतीने “एक नार नवेली डान्स अँड लावणी ग्रुप” ग्रुप प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रुईचे धान्य व्यापारी उत्तम बनकर, सहउद्घाटक म्हणून देवचंद ठाकरे अध्यक्ष वी.जा.ता. काँ. क. ब्रम्हपुरी, उमेशजी घुले सरपंच मुई, उपाध्यक्ष म्हणून बंटीभाऊ गोंदोळे ग्रा. पं. गोगाव, रविंद्रजी ढोरे खरकाळा उपस्थित होते. प्रमूख अतिथी म्हणून गुरुदेव वाघरे उपसरपंच वांद्रा, सुरेश मेश्राम चीचगाव, हेमंत सेलोकर गांगलवाडी व प्रमूख पाहूणे म्हणून के. टी. गावतुरे से.शी. सिंदेवाही, अरुण घुले, दिवाकर ठाकरे, गौरीशंकर डेकोरेशन आरमोरी, देविदास मानकर अध्यक्ष तं. मु. स. मुई, सुरेश चौधरी, मुरलीधर मानकर, मनोज नंदेश्वर, विठोबा मानकर, रुपेश मिसार, सुरेश मिसार, प्रमोद सेलोकर, विलास मसराम, रामचंद्र गायकवाड, देवराव नन्नावरे, गिरिधर रोकडे, रुमदेव अलोने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या लावणी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, संगीत, नृत्य, नाटक, कला आणि साहित्य यासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करतात. गावातील कलाकारांना असे कार्यक्रम प्रोत्साहन देणारे असतात. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणारे असतात .प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी कला गुण आहेत. ते कलागुण मुलांनी जाेपासावे, त्यातून मिळणारा जीवनाचा आनंद घ्यावा. सदैव सकारात्मक जीवन जगावे. असे प्रतिपादन केले.
“अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणजे दिवाळी हा सण आहे. या सणाच्या शुभ पर्वावर नवयुवक बाल गणेश मंडळ तथा जय जवान जय किसान मंडळ मुई आयोजित एक नार नवेली डान्स अँड लावणी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.











