
रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भारत देशाच्या पहिल्या महीला पंतप्रधान, आयर्न लेडी, भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांची जयंती आज दि. १९ नोव्हेंबर रोजी ब्रम्हपूरी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवर यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, माजी जि.प. सदस्य डॉ.राजेश कांबळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, माजी पं.स. सभापती नेताजी मेश्राम, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष राजेश पारधी, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष सतीश डांगे, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष प्राचार्य चंद्रशेखर गणवीर, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, शहर काँग्रेसचे सोमेश्वर उपासे, सुरेश वंजारी यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर यांनी स्व. इंदिराजी गांधी यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय आडमुठेपणासाठी आणि सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनार्थ त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत हा येथील एकमेव प्रादेशिक शक्ती बनला असे यावेळी सांगितले.














