चोवीस तासाचा दिला होता इशारा
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर यांच्या विरोधात दत्तक ग्राम सरपंच संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरूचे रूपांतर आमरण उपोषणाला करण्यात आले, गेल्या सोमवार पासून हे साखळी उपोषण तथापि आमरण सुरू असल्याने आंदोलनाची योग्य दखल घेतली गेल्याने आणि अधिक तोडगा ननिघल्याने सदरच्या पाश्र्वभूमीवर न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या या पक्षाचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, पक्षाचे विदर्भ प्रदेश महासचिव अशोक घोटेकर , महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा पुष्पा मोरे, कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, गौतम भसारकर, रमेश खाडे, दर्शन बदरे, कोरपना महिला आघाडीच्या अध्यक्षा शिला धोटे, धम्म जिवने, चेतना खाडे, जयश्री ताकसांडे, यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा देवून विविध विषयावर रिपब्लिकनच्या सहलीत कंपनीच्या अधिकारी विरुद्ध रोषणाई या वेळी व्यक्त केली होती, दरम्यान लगेच तिनतासात विविध मागण्यांसाठी दत्तक गावातील सरपंच संघटनेच्या सरपंच, उपसरपंच
यांना बोलावून काही मागण्याची तळजोळ करून मागण्या मंजूर केल्या आहे,
सरपंच हा ग्रामविकासाचा कणा आहे, दत्तक गावातील कामे करणे, कंपनीच्या सीएसआर फंड देणे उद्योगांना बंधनकारक असल्याने सरपंचाची मागणी ही रास्त आहे, कंपनीने आंदोलनकत्यांँच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या काही दिवसातच रिपब्लिकनच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.
यावेळी उपोषणाला आवारपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे तर नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य रत्नाकर चटप हे आमरण उपोषणाला बसले होते, दरम्यान सांगोडा येथील माजी सरपंच सचिन बोंडे, बिबी, पालगाव, हिरापूर सह आदी गावातील नागरिक उपस्थितीत.
रिपाइंने जाहीर पाठिंबा दिला असल्याने या आंदोलनाचा तिढा निळाईने सुटला असल्याचे परिसरात मंगलमय चर्चा सुरू आहे.

