prabodhini news logo
Home आर्थिक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून हळदा, मुडझा, कुडेसावली, वांद्रा येथील आपदग्रस्तांना...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून हळदा, मुडझा, कुडेसावली, वांद्रा येथील आपदग्रस्तांना आर्थिक मदत

0
99

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

ब्रम्हपूरी तालुक्यातील हळदा येथील रमेश झरकर (वय ५२ वर्ष) व मुडझा येथील संजय बोबाटे (वय ३५ वर्ष) यांना हृदयविकार झाला आहे. वांद्रा येथील शकुंतला राऊत (वय ५६ वर्ष) ह्या किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. ह्या सगळ्यांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र सदर रुग्णांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने वैद्यकीय उपचार घेतांना त्यांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
हळदा येथील भक्तदास मेश्राम (वय २८ वर्ष) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व २ चिमुकल्या मुली आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या पत्नीला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
कुडेसावली येथील हिवराज पेटकुले (वय ४५ वर्ष) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ते घरातील कर्ता पुरुष होते. त्यांच्या मृत्युमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

याबाबतची माहिती हळदा, मुडझा, कुडेसावली, वांद्रा येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फतीने आपल्या स्वतः कडून सदर आपदग्रस्तांना आर्थिक मदत पाठवली आहे.

सदरची आर्थिक मदत देतांना हळदा ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष नरेश नखाते, ग्राम काॅंग्रेस उपाध्यक्ष भास्कर मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर झरकर, ग्रा.पं.सदस्य गुरुदास नखाते, औद्योगिक सेलचे सहसचिव नरेश राऊत, सोशल मीडिया प्रमुख जोसेफ राऊत, मुडझा येथील सरपंच होनाजी नैताम, ज्येष्ठ कार्यकर्ते आबाजी मुळे, राजू राऊत, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे सचिव रमेश कावळे, कुडेसावली ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष रविंद्र उंदीरवाडे, प्रभाकर हुलके, कालिदास गुरनुले, अमृत हुलके, वांद्रा येथील ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष गुरुदेव वाघरे, ग्राम काॅंग्रेस उपाध्यक्ष यशवंत राऊत, यशवंत राऊत, यशवंत देशमुख, ग्रा.पं.सदस्य सुनील गेडाम, संदीप कोरटे, ग्राम काॅंग्रेस माजी अध्यक्ष दयाराम राऊत, रामचंद्र ठाकरे, करणं वाघरे, लालाजी राऊत, अनुसया राऊत, दिपीका राऊत, ऋतुजा राऊत, सोशल मीडिया प्रमुख सचिन ठवरे यांसह या सर्व गावांतील काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून कोथूळना येथील कॅन्सरग्रस्ताला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत

ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळणा येथील धर्मेंद्र डांगे (वय 50 वर्ष) हे मागील काही दिवसांपासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घेतांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.

सदरची बाब कोथुळणा येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी हातभार लागावा म्हणून आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत पाठविली.

सदरची आर्थिक मदत देतांना माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता राजेश पारधी, कोथुळना येथील सरपंच मा.विकास नाकतोडे, पिंपळगाव भो. येथील सरपंच मा. सुरेश दुणेदार, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे कोषाध्यक्ष मा. राजेश पारधी, माजी सरपंच मा. तुळशीराम बगमारे, माजी सरपंच सुषमा सुभाष राऊत, झीलबोडी येथील काँगेस कमेटी अध्यक्ष मा. रवी शेंडे ग्रा. पं. सदस्य, नवेगाव मक्ता येथील काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा. तुलचंद शिंगाडे, ज्योती धोटे ग्रा. पं. सदस्य, मा. प्रशांत ठाकूर, सुभाष राऊत यांची यावेळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here