डान्स च्या माध्यमातून जिल्ह्याच्या संस्कृतीचे नावलौकिक करा:- डॉ. नामदेव किरसान

0
45


जिद्द ठेऊन प्रामाणिक प्रयत्न केल्यास, यशस्वी व्हाल-महेंद्र ब्राह्मणवाडे

गडचिरोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

डान्स हा प्रचार प्रसाराचा प्रभावी माध्यम असून डान्स च्या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकिक करा व जिल्ह्याच्या संस्कृतीचे जतन करा असे प्रतिपादन डॉ. नामदेव किरसाण यांनी केले. DVS डान्स अकॅडमी गडचिरोली च्या उदघाट्न सोहळ्यानिमित्त ते उदघाट्क म्हूणन बोलत होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हुणुन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, विशेष अतिथी म्हणुन पत्रकार प्रा. अनिल धामोडे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल काँग्रेसचे रुपेश टिकले, टायगर ग्रुप चे जिल्हाध्यक्ष दीपक बारसागडे, DVS डान्स अकॅडमी चे संचालक धर्मेश कौशिक, विक्की मांडवगडे, साई आत्राम उपस्थित होते.
तरुणांनी एकत्रित येऊन DVS डान्स अकॅडमी च्या माध्यमातून जिल्ह्यातील कलाकारांना प्रभावी प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे, जिद्द ठेऊन प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीचा नाव लौकिक होण्यास सुद्धा मदत होईल असा विश्वास महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आपल्या अध्यक्षीय व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कोहळे यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता पूनम पेटकुले, मुग्धा बोरकुटे, समीक्षा उसेंडी, संस्कृती नंदेशवर, कशिश सलूझा यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here