prabodhini news logo
Home चंद्रपूर महिला व बालविकास अधिकाऱ्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला चप्पल घालून केले...

महिला व बालविकास अधिकाऱ्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला चप्पल घालून केले अभिवादन, आंबेडकरी अनुयायांनी संतप्त, रामनगर पोलिसात तक्रार दाखल

0
183

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काल 6 डिसेंबर ला महापरिनिर्वाण दिन होता.अशातच चंद्रपूरतील अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.मात्र चंद्रपुरातील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मीना गिरडकर या अधिकाऱ्यानी चक्क डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला चप्पल लावून माल्यार्पण करत अभिवादन केले.त्यामुळं आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले असून त्यांच्या विरोधात उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपुरातील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मीना गिरडकर या महिला अधिकाऱ्याने याआधी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.त्यामुळं जातिजातीत तेढ निर्माण करम्याचे काम त्यांच्याकडून होत असून अशा महिला अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा जनसमुदाय रामनगर पोलीस ठाण्यात जमा झाला.व रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी राजू झोडे, संपत कोरडे, करूणा भगत,मेघा रिगणे,प्रतिभा मुन, सरिता रायपुरे,सपना बर्वे,सारिका कामतवार,प्रतिमा पेन्दे, श्रद्धा अलोणे आदि अनुयाई उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here