ईपीएस 95 संघर्ष समिती आंदोलनाला आम आदमी पार्टीचे समर्थन

0
74

जास्मिन शेख
जिल्हा प्रतिंनिधी चंद्रपुर

चंद्रपूर, दि. 7 डिसेंबर 2023: देशभरातील ईपीएस 95 पेंशनधारकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला चंद्रपुरातील आम आदमी पार्टीने समर्थन दिले आहे. आज (दि. 7) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.

यावेळी आम आदमी पार्टीचे चंद्रपूर वरीष्ठ नेते सुनिल मुसळे म्हणाले की, ईपीएस 95 पेंशनधारकांना केवळ 300 ते 3 हजार रूपयापर्यंत पेंशन मिळते. त्यावर कुठलाही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही. अशा स्थितीत सन्मानपूर्वक जगण्यास त्यांना अडचण निर्माण होत आहे. या सर्व सेवानिवृत्त पेंशनधारकांना योग्य न्याय मिळावा यासाठी आम आदमी पार्टी नेहमीच त्यांच्यासोबत आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे चंद्रपूर युवा जिल्हाअध्यक्ष राजू कुडे म्हणाले की, ईपीएस 95 पेंशनधारकांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टी पूर्णपणे पाठिंबा देत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला या पेंशनधारकांच्या हक्कांसाठी पावले उचलावी लागतील.

यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे ईतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here