मा.आयुक्त महानगरपालिका चन्द्रपुर यांना स्थानिक लोकांकडून निवेदन सादर
किशोर मडगूलवार
जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर
8055479401
बंकर रोड बाबूपेठ ला लागून एक छोटेशे नागमंदिर आहे त्याला लागून जवडपास अंदाजे 5,000 sq ft खुली जागा असून या जागेवर वार्डात छोटे मुल खेडतात व याच जागेचा मधातून एक रस्ता देखील मागील 30 ते 35 वर्षांपासून लोकांसाठी जण्या येण्याचा एकमेव मार्ग आहे. हाच रस्ता श्रावस्ती बुद्ध विहारा कडे जातो. याच रस्त्यावरून वार्डात आंबूलन्स देखील सहजपणे येऊ आणि जाऊ शकते परंतु मा. पुष्पा प्रमोद मुन माजी नगरसेविका बाबुपेठ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम देखील सुरू केलेले आहे. ज्याच्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. याच अनुषंगाने वार्डातील समस्त नागरिकांनी मा. पुष्पा मुन माजी नगरसेविका बाबुपेठ यांचे अवैध बांधकाम त्वरित थांबवावे या संबंधी चे निवेदन मा.आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांना देण्यात आले आहे. व प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर व मा. तहसिलदार साहेब चंद्रपूर यांना देखील पाठविण्यात आले आहे..

