राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील माध्यमिक आदिवासी आश्रमसाला, जामली आर यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकावून मेळघाट चे नाव संपूर्ण राज्यात उज्ज्वल केले.
मेळघाटतील चिखलदरा तालुक्यातील आडनदी येथील रा. सु.गवई उच्चं व माध्यमिक शाळेत सम्पन्न दोन दिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जामली येथील आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग 10वि चा विद्यार्थी चि. श्याम रामसिंग कासदेकर याच्या “बहुउद्देशीय चूल ” या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला श्यामच्या या यशाबद्दलत्याचे समार्गदर्शक आर. एस. भरे, शाळेचे परीचर एस. ए. कथालकर व मुख्याध्यापक आर. आर. येऊल यांनी अभिनंदन पर कौतुक केले तसेच या यशाबद्दल श्याम वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरूच आहे

