कोकण कृषी विद्यापीठात आठवी पास उमेदवारांसाठी भरती

0
94

अर्ज करण्याची शेवटची तारीख

DBSKKV Dapoli Recruitment 2023: तुम्ही आठवी पास असाल आणि तुम्हाला वाहन चालवण्याचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ही भरती मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयासाठी होणार आहे. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत मुळदे येथे ‘ट्रॅक्टर चालक’ पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २६ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
ट्रॅक्टर चालक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान इयत्ता ८ वी उत्तीर्ण असावा. ट्रॅक्टर व तत्सम जड वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना त्याच्याकडे असावा. तसेच ०२ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव असाव. विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन : १५ हजार (मासिक)

नोकरी ठिकाण : उद्यानविद्या महाविद्यालयम मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

वयोमर्यादा : किमान १८ वर्षे ते कमाल ५८ वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२३

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २६ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here