आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहराध्यक्ष सुरज शहा यांना अटक

0
262

भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

भद्रावती- आज दि. 15 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज भाऊ शहा यांना भद्रावती पोलीस द्वारे अटक करण्यात आले. दिनांक 13 डिसेंबर 2023 पासून डोलारा तलाव भवती संरक्षण भिंतीचे बांधकाम करून खोलीकरण करण्यात यावे व आउटलेट ची व्यवस्था करण्यात यावी व भद्रावती शहरातील संपूर्ण अतिक्रमण धारकांना नियमानुकूल करून जागेचे पट्टे देण्यात यावे या मागण्यांना घेऊन झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता तथा त्यांची आरोग्य विषयी विचारपूस करण्याकरिता गेले असता सुरज शहा यांनी भाषणाद्वारे राहुल सोनटक्के यांच्या समर्थनात नारेबाजी केली असता, पोलिसांनी सुरज भाऊ शहा यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक होताच डोलारा प्रभागातल्या जनतेमध्ये रोष निर्माण झाले. काही वेळानंतर सुरज शहा यांची पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here