prabodhini news logo
Home कोपरगाव तडीपार/ एम पी डी ए/हद्दपार/अँटी करप्शन मध्ये अनेकांना शासकीय यंत्रणांना धास्तावणाऱ्या तस्कराचा...

तडीपार/ एम पी डी ए/हद्दपार/अँटी करप्शन मध्ये अनेकांना शासकीय यंत्रणांना धास्तावणाऱ्या तस्कराचा वाळू चोरीचा सिंडिकेट अड्डा

0
499

नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677

कोळगाव थडी मध्ये गेल्या दीड महिन्यापासून ते आज दिनांक 25/4/2025 रोजी पहाटे ही बेसुमार ट्रॅक्टर व डंपरने चोऱ्या चालू होत्या परंतु आत्ता सध्या भर दुपारी सकाळ पासूनही कोळगाव थडी मध्ये असलेल्या बेसुमार साठ्यातून वाळू साठेचोरून नेण्याचा अजब गजब प्रकार चालू आहे ही चोरी गेल्या दीड दोन महिन्यापासून चालू आहे परंतु सर्व महसूल पोलीस यंत्रणा या डेपोवरील ट्रॅक्टर व डंपर वर कारवाई करण्यासाठी का? का? घाबरतात याचं कारण येथील पुष्पराज यांच्यावर अँटी करप्शन सारखी कारवाई करू नये. कारण सर्व यंत्रणेचे हात मलीन झालेले आहे आणि कुणाचा ट्रॅक्टर डंपर पकडला तर या पुष्पराजच्या अँटी करप्शन च्या जाळ्यात कोणता अधिकारी केव्हा बसेल हे सांगता येत नाही, म्हणून कोळगाव थडी मध्ये महसूल चे कोणतेही पथक आले व पोलीस यंत्रणा आली तर चोर वा वाहनावर कारवाई केली जात नाही फक्त चोर पोलीस खेळाप्रमाणे दिखावा केला जातो या गोष्टीला स्थानिक ग्रामस्थ वैतागलेले आहे रोज तक्रारी करून वाळू चोरी थांबता थांबत नाही व महसूल पोलीस यंत्रणा ठोस कारवाई करत अजिबात नाही रोज महसूल व पोलीस यंत्रणाच्या गाड्या रिकाम्या दिखावू गर्क्या मारतात बऱ्याच वेळा ग्रामस्थांना समोरासमोर लेन देन अशाही घटना दिसतात की तलाठी महसूल समोर वाळूचे ट्रॅक्टर डंपर जेसीपी बिंदास वाळू भरून निघून जातात तलाठी बघ्याचीची भूमिका घेतात परंतु चोरून चाललेल्या ट्रॅक्टरवर डंपर वर त्यांच्यावर कारवाई केलीच जात नाही सध्या तर असं अजब गजब प्रकार पाहावयास मिळत आहे की या पुष्पराजच्या म्हणण्याप्रमाणे सर्व वाळू स्टॉक उचलू द्या जर उचलू दिला नाही तर तुमच्याकडे बघून घेतो अशी सर्रास शासकीय महसूल पोलीस यंत्रणेला धमकीच दिली आहे या पुष्पराजसमोर सर्व महसूल व पोलीस यंत्रणा नतमस्तक झाली की काय असा प्रश्न पडत आहे शासनाच्या नाकावर टिचून भर दिवसाही या महाशयाच्या अंतर्गत असलेले जेसीपी डंपर भर दिवसा गोदावरीत वाळू भरतात व डंपरही भरून लंपास करतात परंतु कोणाचीही या महाशयाला ट्रॅक्टर डंपर अडवण्याची हिंमत होत नाही म्हणून हद्दपारचे नवीन कठोर कायदे अंतर्गत प्रस्ताव तयार झालेले सर्व चोर व तडीपार झालेले सर्व चोर एमपीडीए लागलेले सर्व चोर या चोरीस सहभागी आहे यांच्यावर सुद्धा पुन्हा एम पी डी अंतर्गत शासनाची दहशत होईल अशी कारवाई करणे गरजेचे आहे सर्व हद्दपारंना पुन्हा नोटीसा पाठवून कारवाईचा धाक उभा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे कोळगाव थडी येथील सर्व साठे जप्त करण्याचे आदेश द्यावे चोर व चोरांची वाहने शोध घेऊन ती जप्त करावी सर्व साठ्याचा पंचनामा करण्यात यावा जुन्या गावठाणा गोदावरी कडेला स्मशानभूमी शेजारी जुने गावठाणाच्या आसपास हनुमान मंदिरा शेजारी अनेक वाळूसाठे उपलब्ध आहे केलेले आहे यासाठी सर्व तालुक्याबाहेरची टीम बोलावून प्रामाणिक पंचनामा करून साठे जप्त करावे व या साठ्याला पोलीस व प्रामाणिक बाहेरगावचे पथक तैनात करण्यात यावे तसेच या चोरीचे सर्व रस्ते मोठ्या जेसीपी ने खोदून खोल खोल नाल्या घेऊन नाल्या भूजवणावर कारवाई करण्याचे आदेश द्यावे कारण स्थानिक पथक तलाठी काही कामाचे राहिलेले नाही सध्या चालू असलेल्या चोरीचे चोरी चीरीचे डंपर जातानांचे डंपरचे सध्याचे चलचित्र लोकेशन सहित पुरावे लायु पाठवत आहे ही चोरी शासकीय महसूल पथकाच्या समोर भरून जात आहे म्हणून कोळगाव थडी जुन्या गावठाणा च्या स्मशानभूमी शेजारील सर्व साठे जप्त करण्यात यावी असे तातडीने आदेश देण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here