बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीअंतर्गत शासकीय अनुदानातून ३० दिवसाचे बांबू फर्निचर प्रशिक्षणसाठी बांबू फर्निचर क्षेत्रातील विविध कारागिरांकडून व बांबू फर्निचरबाबत आवड असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर प्रशिक्षणात फक्त २० उमेदवारांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात-लवकर अर्ज करणे गरजेचे…
BRTC Training and Jobs : महाराष्ट्र वनविभाग, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली, चंद्रपूर (BAMBOO RESEARCH & TRAINING CENTRE, CHICHPALLI) अंतर्गत ‘बांबू फर्निचर प्रशिक्षण’ दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून, या भरतीच्या माध्यमातून कारागीर आणि इतर उमेदवार पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १५ डिसेंबरपासून या अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.
प्रशिक्षण आणि भरतीचा तपशील :
संस्था : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली, चंद्रपूर
भरले जाणारे पद : कारागीर आणि इतर उमेदवार
पद संख्या : २० जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली (स्थित-चंद्रपूर) बंगला नं.२८, सिव्हील लाईन, आकाशवाणीजवळ, चंद्रपूर- ४४ २४ ०१
प्रशिक्षण आणि नोकरी करण्याचे ठिकाण : चिचपल्ली चंद्रपूर
वयोमर्यादा :
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली, चंद्रपूरच्या प्रशिक्षण आणि भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षे असावे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली, चंद्रपूरच्या भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारचे किमान दहावी पर्यंतचे शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जाचा नमुना brtc.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
4. अर्ज प्रक्रिया १५ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.
काही महत्वाच्या लिंक्स :
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटीच्या प्रशिक्षणाच्या आणि भरतीविषयी अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

