प्रज्ञा निमगडे
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
धानोरा- दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी निमगांव (रांगी) ता. धानोरा जि. गडचिरोली येथे परिवर्तन नाट्यकला मंडळ निमगांव च्या वतीने आयोजित “शहीद” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉक्टर नामदेव किरसान यांनी त्यांचे उद्घाटकीय भाषणात लोकशाहीचे महत्त्व पटवून देतांना सांगितले की, हुकूमशाहीत क्रांतिकारकांनी केलेली आंदोलने हिंसक होती. महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम अहिंसेच्या मार्गाने सुद्धा संघर्ष करता येतो हे शिकविले. लोकशाहीमध्ये हिंसेचा अवलंब न करता मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणता येते. येणाऱ्या काळात आपल्याला परिवर्तन घडवून आणायचे असेल तर सतसद विवेक बुद्धीचा वापर करून मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, दिघेश्वर धाईत, डॉ. नरेश आलाम, निराशाताई वरखडे, संदीपभाऊ वरखडे, पुरुषोत्तमजी बावणे, प्रशांत केराम, गावडे पाटील, सुरेशजी खोबे, संजय खोबे, माणिक पेंदाम, प्रमोद बोभाटे, रोहिदास किरंगे, विनायकजी कन्नाके, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

