
भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भद्रावती- दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी सेवा फाउंडेशन भद्रावती मार्फत गरजू लोकांना कंबल व ब्लँकेट वाटप करण्यात आले. सेवा फाउंडेशन भद्रावती हे प्रत्येक वेळी सामाजिक कार्य करत असतात. यावेळी सुद्धा सेवा फाउंडेशन भद्रावती मार्फत भद्रावती येथे नागमंदिर ते बस स्टॅन्ड पर्यंत फुटपाथ वर झोपणाऱ्या गरजू लोकांना कंबल वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय भद्रावती, घोडपेठ, तडाली, पडोली, चंद्रपूर व ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे सुद्धा कंबल व ब्लॅंकेट गरजू लोकांना वाटप करण्यात आले. प्रत्येक गरजू लोकांनी सेवा फाउंडेशन भद्रावतीच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.














