prabodhini news logo
Home चंद्रपूर ट्रकचालकांच्या संपामुळे जनजिवन विस्कळीत

ट्रकचालकांच्या संपामुळे जनजिवन विस्कळीत

0
155

स्वप्निल मोहितकर
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज भद्रावती

भद्रावती – शासनाने केलेल्या नवीन वाहन कायद्यामुळे ट्रक सह इतर ही वाहनचालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा वाहन चालकावर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत वाहन चालकांनी १ जानेवारी पासून राज्यभर आंदोलन पुकारले आहे. केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायदयामुळे सर्वच वाहन चालकात संताप लाट दिसून येत आहे. नविन कायदा वाहन चालकासाठी अन्यायकारक असल्याचा आरोप करीत राज्यातील अनेक भागातील चालकांनी आंदोलन केले.
इंडियन आईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून इंधन आणि ग्यास सिलेंडर ची वाहतूक करणारे वाहन चालक सुद्धा संपात सहभागी होऊन कामबंद आंदोलन पुकारला आहे.
नवीन मोटार कायद्या रद्द करण्याची किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी वाहन चलक करत आहे.
स्थानिक भद्रावती येथे पेट्रोल पंपवर पेट्रोल नसल्याने बंद पडले आहेत. या संबंधात पेट्रोल पंप मालक यांना विचारणा केली असता वाहन चालकांच्या संपामुळे पेट्रोलची आवक बंद झाली असून असलेला पेट्रोलचा साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद करून ठेवण्याशिवाय पर्याय नाही असे सांगण्यात आले. याचा फटका मात्र सामान्य नागरिकांना भोगावा लागत असून पेट्रोल घ्यायला आले असता नगरातील पेट्रोल पंप अचानकपणे बंद आहेत असे कळल्यावर त्यांचा मनःस्ताप होत आहे.
अनपेक्षित आलेल्या या परिस्थितीमुळे दैनंदिन व्यवहार तसेच प्रवास करणे कठीण झाले आहे.त्यामुळे नागरिकांचे हालबेहाल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here