कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब द्वारा आयोजित स्व.बालुभाऊ लोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रात्रकालीन प्रो कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद प्रथम पारितोषिक सिंदेवाही संघाने मिळविले आहे. तर देलनवाडी संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानवं लागले.तृतीय पारितोषिक नवरगांवने पटकाविले,चतुर्थ पारितोषिक राजोली संघाने मिळविले आहे.विजेत्या संघाला रोख-रक्कम ,बक्षीस देण्यात आले.
या कबड्डी स्पर्धेच्या समारोपीय सोहळ्याप्रसंगी सुशांत बोडणे शहर अध्यक्ष नवरगांव काँ.कमेटी,स्वातीताई लोणकर ग्रा.पं.सदस्या.दादाजी चनबनवार अध्यक्ष तं.मु.स.,संजयजी सोनकुसरे, नरेंद्र लोधे शिक्षक, ठोनु जैस्वाल, सुभाष शिंदे, दिवाकर दुधकुरे,अतुल शेंडे, शांत बहिरवार सोशल मिडीया समन्वयक काँग्रेस, जितु डुंबरे, प्रणव गायकवाड,धनेश वंजारी, दिपक बोरकर,किशोर नंदनवार,पंकज शेंडे,श्रीकांत गडपल्लीवार, मिथुन सोनकुसरे,गोलु बहिरवार,विक्की गेडाम, चंद्रशेखर बहिरवार,सारंग बहिरवार,राहुल टेंभुर्णे,आकाश लिमजे, दर्शन लिमजे तथा समस्त विजय फँन्सक्लब सदस्यगण आणि नवरगांव ग्रामवासीय प्रामुख्याने उपस्थित होते.

