संघर्ष व जिद्दीने मिळवले यश!
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी,सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील एकता प्रदीप नागदेवते हि मुलगी,हिचे शिक्षण जिल्हा परिषद शाळे मध्ये झाले,अगदी समज यायला लागल्यापासून अभ्यासामध्ये आपली चमक दाखवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत होती,स्वतःला या जगात घडवायचं आहे,आणी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करत अभ्यासाला लागली, परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबावर भार होऊ नये म्हणून सुरवातीला अल्पशा मोबदल्यात सुद्धा नोकरी केली,व त्यामधून मिळणाऱ्या पैश्यातून स्पर्धा परीक्षा ची पुस्तके घेऊन अभ्यास सुद्धा करत होती, स्वतःच या समाजात अस्तित्व निर्माण करण्याची इच्छाशक्ती शांत बसू देत नव्हती,नोकरी करता करता परीक्षा देत होती , पण नशीब साथ देत नसल्याने अगदी काठावर येऊन अल्पश्या गुणांनी अंतिम टप्यात निवड चुकत होती,पण निराश न होता या ही परिस्थिती पुन्हा स्वतःला सावरत जोमाने अभ्यासाला सुरवात करायची,आपल्या प्रयत्नाला नक्की यश येईल,हा स्वतःवर तिचा विश्वास होता,आणी त्याचं अभ्यासाच्या जिद्दीच्या परिश्रमाने एकता आज घवघवीत यश मिळवले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य कर निरीक्षक तसेच कक्ष अधिकारी या परीक्षेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली,
मौजा लाडबोरी मधील सन्मा. दिवंगत प्रदीपजी नागदेवते यांची मुलगी,प्रदीप नागदेवते हे तालुक्यात समाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते,आपल्या मुलीला घडविण्यासाठी प्रयत्न करत होते,त्यामुळे एकता ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्या वडिलांचा खूप मोठा आधार होता आणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं याचं ध्यासान अभ्यास करत होती, पण अचानक आपल्या पाठीमागे असलेला आधार स्तंभ प्रदीपजी नागदेवते हे अचानक पणे कायम सोडून गेला, आणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तरी या सर्व परिस्थिती सामाना करत स्वतःला सावरत पुन्हा त्याच जोमाने परत एकदा अभ्यास करणे सुरु केला,आपल्या यशाच संपूर्ण श्रेय आपल्या वडिलांना देऊन श्रद्धांजली वाहिली आहे,आज विक्रीकर अधिकारी म्हणून एकता नागदेवते ची निवड झाली असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी,मित्र मंडळी नी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

