भद्रावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
तथागत गौतम बुद्धाचे मूर्ती तोडणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित अटक करावी. याकरिता भद्रावती येथे कडकडीत बंद पाळण्यात आले.
१ जानेवारी पहाटे पहाटे भिमा कोरेगाव विजय शौर्य दिनाच्या पर्वावर भद्रावती येथील अशोक सम्राट कालीन विजासन बुध्द लेणी वरील तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा मुर्ती काही समाज कंटकांनी तोडफोड करुन विटंबना करण्यात आली जेंव्हा भद्रावती येथील लोकांना हि बातमी कळली संपूर्ण भद्रावती करांना कळली तेंव्हा त्यांचा संताप अनावरण झाला व समाज कंटकांना त्वरीत अटक करावी याकरिता संपूर्ण भद्रावती कडकडीत बंद पाडण्यात आले व राञभर जागुन समाज बांधवांकडून २ दोन ते अडीच लाखांचे कलेक्शन करुन रातोरात नागपुर वरुन ७ फुटाची चलती उभी तथागत गौतम बुद्धाची मुर्ती आणुन त्याच जागी आज भंते लोकांच्या व जनसमुदाया समोर बसवण्यात आली यावेळी बल्लारपूर चे विश्वास देशभ्रतार दुरेश तेलंग प्रदिप झांबरे गौतम रामटेके सत्यभामा भाले वत्सला तेलंग नम्रता साव वरमाला भास्कर व इतरही महिला उपस्थित होते .

