मेन गेट पुढे व बाजुला “चिकन” व “बैलभात” विक्री सेंटर्स असलेली शाळा “सुंदर” असु शकते का ? हो…

0
153

हंडरगुळीच्या जि.प.शाळेतील मुलांचा व शिक्षणप्रेमींचा “मुख्यमंञ्यांना” प्रश्न

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

उदगीर- राज्यभर मुख्यमंञी माझी शाळा सुंदर शाळा, हा उपक्रम राबविला जात आहे.आनी लाखोंचे बक्षीस शासन देणार आहे. अक्षी बातमी वाचण्यात येत आहे.पण पण ज्या शाळेच्या जुन्या मेन गेट पुढे व राज्यमार्गालगत सा.बां.विभागाने बांधलेल्या नालीवर अतिक्रमण करुन खुलेआम सुरु असलेल्या “चिकन” सेंटर्समुळे तसेच कन्या शाळे शेजारी असलेल्या “बैलभात=बिर्याणी” विक्री सेंटर्स / खानावळींमुळे आमची शाळा “सुंदर” असु शकते का ? हो $ $ $ असा “रोख=ठोक” सवाल मुख्यमंञी एकनाथ शिंदे व शिक्षणमंञी महाराष्ट्र यांना हंडरगुळी ( ता.उदगीर_ जिल्हा लातुर ) या गावच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत “घाण वास” घेत शिकणारे गरीब मुलांसह मुलींनी तसेच शिक्षणप्रेमीं जनतेतुन विचारला जात आहे.तसेच ज्या रोडवरुन रोज हजारो वाहणे ये-जा करतात तसेच ज्या रोडवरुन गावात जातात त्याच राज्यमार्गालगत असलेल्या जि.प.कें. प्रा.शाळेला अगदी हातभर दुरच्या अंतरावरच “माॅंस” विक्री होत असुन, अशा प्रकारे शाळेच्या कंपाऊॅंड भिंती लगतच “चिकन=मटन=बैल बिर्यानी” विक्री होत असलेली राज्यातील एक – मेव शाळा असु शकते.म्हणुन या जि. प.शाळेला”माझी शाळा,सुंदर शाळा” या उपक्रमाअंर्तगत मुख्यमंञी आणि शिक्षणमंञी महोदय कोणते “गीफ्ट” देणार ? विशेष म्हणजे राज्यमार्गा शेजारी बी & सी (PWD) ने बांधलेले दोन्ही बाजुच्या नालीवर अनाधिक्रत अतिक्रमन करुन चालु असलेल्या “माॅंस” विक्रेत्यांना P.W.D विभाग व पंं.स. जि.प.प्रा.शिक्षणाधिकारी हे का “आधार” देतात.”मंथली गिफ्ट” वगैरे मिळते म्हणुन काय.अशी कुजबुज या परिसरातील शिक्षणप्रेमींतुन होतेय..! तरी अशा प्रकारे अतिक्रमण करुन व अवैधरित्या शाळेला लागुनच “चिकन मटन व बैलांची बिर्याणी” विक्री सेंटर असलेली जि.प.शाळा ही खरोखरच सुंदर व चिमुकली मुले,मुलीं हे निरोगी असु शकतील का.जर असेल तर मग मुख्यमंञी साहेब बक्षीस देणार ! का, अतिक्रमित जागेवर तसेच शाळेच्या जुन्या मेन गेटला व राज्यमार्गाला लागुनच “माॅंस-मटन” विकणा-यांवर मुख्यमंञी व सा.बां.मंञी महोदय हे “बुलझोर” फिरवणार का व कधी..? याकडे हंडरगुळीच्या शाळेतील सर व गरीब बिच्चा-या मुलामुलींसह शिक्षण प्रेमींचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here