prabodhini news logo
Home ठळक बातम्या महाड येथील धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने समता सैनिक दलाचा निषेध

महाड येथील धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने समता सैनिक दलाचा निषेध

0
141

कल्याण महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल अनिकेत उबाळे महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन

मुंबई प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

मुंबई दिनांक 23 जानेवारी २०२४ ला चवदार तळे परिसर महाड. जिल्हा रायगड येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात राम मंदिर उदघाटन संदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात रामाचे मोठे मोठे बँनर लावून डीजे देखील लावण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा त्या परिसरात लावण्याची परवानगी देऊन महाड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते याचा विचार देखील केलेला दिसत नाही किंवा हे सर्व जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तरी याची गंभीर दखल घेण्यात यावी. कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावण्याचा आमचा विचार नाही. पण असे असताना बौद्ध / आंबेडकरी समाजाच्या भावनांचा विचार तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित पोलीस प्रशासन यांनी केलेला दिसत नाही.
सदर कार्यक्रम हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्यासमोर लावण्यात आल्याने बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी अश्या बेजबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तत्काळ बरखास्त करण्यात यावे व सदर कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
असे निवेदन काल समता सैनिक दल महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी तर्फे मुंबई विभागातील कल्याण तहसीलदारांना देण्यात आले. या प्रसंगी समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल अनिकेत उबाळे, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मंडळ सदस्य मार्शल हिवराज टेंभूर्णे, मार्शल रमाकांत लिंगायत व मुंबई विभाग निमंत्रक मार्शल अरुण हिवरे, प्रवीण वाघ उपस्थित होते.
या प्रकरणाला घेऊन जर उद्या महाराष्ट्रात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी महाडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि महाड शहरातील पोलीस प्रशासन जबाबदार असेल याचा इशारा समता सैनिक दलाकडून देण्यात आला तसेच या घटनेचा जाहीर निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here