
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपुर :- येथील उर्जानगर कोंडी वार्ड क्र. 5, पोलिस स्टेशन दुर्गापुर येथे शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांचे कल्पनेतून अयोध्या येथील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पुरुषोत्तम बावणे यांच्या हनुमान मंदिरात व श्री राम प्रतिमेची पूजा अर्चना, दीप प्रज्वलन, भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम करुन राम लल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता युवा तड़फदार कार्यकर्ते निखिल भोयर, नंदु मोंढे, रोहन बावणे आणि आदर्श महिला बचत गटाच्या महिला यांनी अथक परिश्रम केले.














