
जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी.
उमरी प्रतीनीधी
प्रबोधिनी न्युज
उमरी – तालुक्यातील मौजे बोथी येथील राशन दुकानदार शंकर वाघे यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावे या अनुषंगाने झुंजार क्रांती सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरीफ निमटेककर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे सविस्तर वृत्त असे की बोथी गावामध्ये राशन दुकानदार हे जाणून बुजून गावातील गोरगरीब लोकांना राशन देत नाही यामुळे नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.गावातील नागरिक राशन दुकानावर गेल्यावर त्यांना सांगतात,की तूमचे नावाने राशन मिळाले नाही, तूमचे नाव यादीमध्ये आले नाही,तसेच तुम्ही तहसीलदार यांना भेटा
तरच तुम्हाला राशन मिळेल, असे सांगून लोकांना माघारी पाठवित असतात.राज्यात चालू असलेल्या शासन देत असलेल्या तांदूळ, गहू व साखर, दाळ हे धान्य आलेले नाही,असे सांगतात व मौजे बोथी येथील राशनचे धान्य व बराच माल मौजे तुराटी येथे साठवून ठेवून तिथून ते काही माल छोट्या मालवाहू टेम्पो द्वारे बोथीला आणुन मोजक्या लोकांना वाटप करतात आणि राहिलेला माल थेट काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जातो त्यामुळे राशन वाटप करत नाहीत असे गावातील नागरीकांनी सांगितले असे मत झुंजार क्रांती सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरीफ निमटेककर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले ते असेही म्हणाले की आम्हाला बोथी गावातील लोकांनी फोन केला असता आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणुन आम्ही गावात गेलो असता सदरील दुकानात राशनच नव्हते आणि गावात दुपारी दवंडी दिली की आजच राशन भेटणार उद्या माल संपला तर तुम्ही जबाबदार अशा प्रकारे दवडीं राशन दुकानदार शंकर वाघे यांच्या व्दारे देण्यात आली होती आणि गावकरी आले तर दुकानात माल नसल्याने गावातील नागरिकांनी सविस्तर हकीकत सांगीतली तर सगळा प्रकार खरा होता.आम्ही राशन दुकानदार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मला प्रत्येक पोत्यात सहा ते सात किलो धान्य कमी येते म्हणून मी अशा प्रकारे अडजेस्ट करतोय असे सांगितले यामुळे गावातील गोरगरीब लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी मेहरबान साहेबांनी मौजे बोथी येथील राशन दुकानदार शंकर वाघे यांची चौकशी करून तात्काळ त्यांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती मा जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. जोपर्यंत बोथी येथील नागरिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत झुंजार क्रांती सेनेच्या वतीने हा लढा चालू राहील असे मत शेख आरीफ निमटेककर यांनी व्यक्त केले.











