
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा चंद्रपूर जिल्याचे माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत नवरगाव येथील अमोल महादेव गजभे वय 34 वर्ष या तरुणाचे आकस्मित निधन झाले होते. घरचा तरुण कर्ता पुरुष गेल्यामुळे घरच्या कुटूंबावर प्रचंड आघात झाला होता. याची दखल घेऊन विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवर यांच्या तर्फे मदत देण्यात आली. तसेच सरपंच राहुल बोडणे नवरगाव यांच्या कडून सुद्धा वयक्तिक आर्थिक मदत मयंत अमोल गजभे यांच्या कुटुंबांना देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजा नवरगाव येथील अमोल महादेव गजभे वय 34 वर्ष हे काम करण्यासाठी बाहेरील राज्यात गेले होते. काम करत असतात अचानक त्यांची तब्बेत बिघडली होती. त्यातच त्यांच्यावर नागपूर येते उपचार सुरु असताना काळाने झडप घातली. कुटूंबातील घरची परिस्थिती अंत्यत खराब असल्यामुळे त्यां कुटूंबाना थोडी आर्थिक मदत व्हावी हि भावना लक्षात घेऊन त्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. त्या कुटूंबाना मदत व्हावी या हेतूने नवरगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली होती. त्यानुसार नवरगाव येथील ग्रामपंचायत सरपंच राहुल बोडणे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष सुशांत बोडणे, ग्रा. पं. सदस्य तथा सरचिटणीस पंकज उईके, ग्रा. पं. सदस्य श्रीकांत हेडाऊ, काँग्रेस उपाध्यक्ष सर्फराज पठाण, सचिव आनंद मेश्राम, तंमुस अध्यक्ष दादाजी चंनबनवार, सचिव मनोज येसनसुरे, काँग्रेस कार्यकर्ता नितीन गेडाम व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.














