जस्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
सामान्यातून असामान्य पर्यंत ज्यांचा आयुष्याच्या प्रवास झाला असे थोर स्वातंत्र्य सेनानी बेलदार समाजाचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब उर्फ स्व.मा सा. कन्नमवार यांची 124 वी जयंती बाबू पेठ बेलदार समाज बाबूपेठ चंद्रपूर तर्फे हनुमान मंदिर जय हिंद चौक बेलदार पुरा येथे साजरी करण्यात आली. त्यामध्ये रॅली, संस्कृतीक कार्यक्रम, डान्स आणि वेषभूषा त्यानंतर सहभोजन देण्यात आले.
22 जाने. ला राम प्रतिष्ठान व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच मान्यवर उपस्थित त्यांनी स्वर्गीय मा. सा. कन्नमवार यांच्या जीवन चारित्रा बाबत मनोगत व्यक्त केले.
असे विनोद पेनलिवार यांनी कळविले.

