प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर- बाबुपेठ येथे दिनांक १९/०१/२०२४ शुक्रवार रोजी सायंकाळी ४ वाजता मुकबधीर वसतिगृह बाबुपेठ बायपास रोड येथे संदीप राऊत यांचे दोन्ही मुलं यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुलांना नोटबुक पेन आणि केक चे वितरण करण्यात आले. मूकबधिर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे मनोबल व उत्साह वाढवा, त्यांना आनंद मिळावा, केक चा आस्वाद घेता यावा, शैक्षणिक वस्तूंचा लाभ मिळावा या सर्व बाबींना उद्देशून हा उपक्रम माणुसकी ग्रूप चंद्रपूर यांचे कडून यशस्वीरीत्या राबविण्यात आला. तसेच मूकबधिर असून देखील आपणही कुठे कमी पडणार नाही, उद्या आपणही मोठे झाल्या नंतर समाजाचा एक भाग म्हणून सामजसेवा करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या यावा, समजसेवा करण्याचे संस्कार त्यांच्यावर व्हावेत हा महत्वाचा उद्देश होता.
असे छोटे मोठे अनेक उपक्रम माणुसकी ग्रूप चंद्रपूर च्या टीम मेंबर्स कडून राबविले जातात.
माणुसकी ग्रूपच्या अश्या उपक्रमांमुळे गरजूंना आणि समजसेवा करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांना एकमेकांपर्यंत सहज पोहचता येते.
आपणासही अशी गरजूंना मदत करायची असल्यास माणुसकी ग्रूप च्या सदस्यांशी संपर्क करावा. असे आव्हान
माणुसकी ग्रूप चंद्रपूर यांच्यावतीन करण्यात आले…
मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदातीचा हाथ द्या.

