दयावान सरकार, समाजहित अभियान प्रतिष्ठान व भीमा कोरेगाव मित्र मंडळाचा हा सामाजिक उपक्रम
परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
परभणी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे, कार्यसम्राट, दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे, कर्तव्यदक्ष अधिकारी समाज कल्याण निरीक्षक मा. एच.ए. सय्यद यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांना सय्यद साहेब यांच्या हस्ते फळ स्वरूपात केळी वाटप करून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. हा सामाजिक उपक्रम दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणी, समाजहित अभियान प्रतिष्ठान व भीमा कोरेगाव मित्र मंडळ या सामाजिक संघटनांच्या वतीने प्रमोद अंभोरे, संदीप वायवळ, प्रेम तूपसमुद्रे यांनी आयोजन केले होते. यावेळी रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांनी सय्यद साहेब यांना आशीर्वाद रुपी शुभेच्छा देत दीर्घायुष्याच्या कामना व्यक्त केल्या आहेत. यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान तथा संपादक समाजहित न्यूज तथा सदस्य भीमा कोरेगाव मित्र मंडळ परभणी चे प्रमोद अंभोरे, भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, प्रेम तूपसमुद्रे, रामसिंग अंभोरे, निखिल बेकटे, प्रशिक वानखेडे, पुष्पक जावळे, सुबोध तूपसमुद्रे आदींची उपस्थिती होती. सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल मा श्री एच ए सय्यद यांनी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, समाजहित अभियान प्रतिष्ठान व भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे आभार मानले आहे.

