सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर – स्थानिक स्नेहनगर येथील सितला माता मंदिर परिसरात भावसार समाज महिलांचा पर्यावरण पूरक हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. माता हिंगुलांबिका यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून स्तोत्र व आरती करण्यात आली. योगिता धनेवार अध्यक्ष भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूर, कमल आलोने ज्येष्ठ समाजसेविका, प्रेमिला मुधोळकर, शुभांगी साधणकर, दीपा कुठे यांनी द्वीप प्रज्वलन केले. वाणात फुलझाडे तसेच गृह उपयोगी वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांचे संगीत खुर्ची, वेशभूषा स्पर्धा, उखाणे स्पर्धा, तंबोला, लिंबू चमचा, दौड,मी शिवाजी, वन मिनिट शो यासारखे महिलांचे मैदानी व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. समाज भगिनींनी अगदी उत्साहात दिवस सार्थकी केला.चर्चा सत्रामध्ये भावसार समाजाची दशा व दिशा, महिलांचे सबलीकरण व त्यांच्या स्वयंरोजगाराबाबत दीर्घ चर्चा घेण्यात आली.यात सर्वांनी समाज उन्नती, एकीकरण,संघटित होतील तेंव्हाच प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील यावर भर दिला यात वासंती लखपती, प्रीती लखदिवे, अश्विनी लंगडे,अभिलाषा मैंदलकर, वैशाली भागवत, कल्याणी कळमकर, प्रीती मुधोळकर, मीनाक्षी साधनकर, जयश्री गोजे, सुषमा तांदळे, वैशाली हजारे, अर्चना तांदळे, प्रीती गोजे, स्वाती बोडके, मंजुषा मांडवगडे, अनुराधा कळमकर, वैशाली ढगे, अर्चना सराग, मंगला धनंजय, प्रणिता साधनकर, धनश्री माळवी, हेमांगी साधनकर, श्वेता रत्नपारखी, हर्षला दखणे, कल्याणी पेटकर, मीनाक्षी अलोने, वैशाली साधनकर, शितल तांदळे, साक्षी वळसे, सुरभी, सोनिया कथडे, स्मिता जिराफे, विभा जोशी, आदी महिलांनी हिरीरीने सहभाग घेतला.भावसार समाजातील महिलांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

