लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
शासनाने कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरीही या 2 गावात माञ प्लास्टिक पिशव्या विक्रेत्या होलसेल व्यापा-यांची मोठी आर्थिक चांदी होताना दिसत आहे.व यावर नियंञण ठेवून कार्यवाही करणारी यंञणाच अस्तित्वात नाही. म्हणुन तर होलसेल मध्ये दामदुप्पटीने कॅरिबॅग बंडल विकणा-यांची “बुलेट” सुसाट सुटली असुन,प्लास्टिकच्या बंदीचा कायदा हा कागदावर आहे . व यावर कार्यवाही करणारी यंञणा ही कोमात गेल्यामुळेच याची विक्री जोमात दिसते.उदगीरहून एकजण कधी दुचाकीवर तर कधी एस.टी.बस ने येऊन येथे प्लास्टिक पिशव्या विक्री करतो.अशी चर्चा प्रत्यक्षदर्शीत आहे. बंदी असुनही हा कायदा कागदावरच राहिला आहे.कारण गावागावात खुले – आमपणे बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर सर्रास होताना दिसतोय.आणी याचा वापर व व्यापार करणा-यांवर कसलेही व कुणाचेही भय नाही. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मुक्या प्राण्यांचे आरोग्य धोक्यामध्ये आले आहे.याबरोबरच पर्यावरणाचा —हास ही होत आहे.हाळीहंडरगुळी येथील जवळपास दहा व्यापारी यात आठ किराणा दुकाणदार असे आहेत जे परराज्यातुन हलक्या जाडीच्या कॅरिबॅगा मोठ-मोठ्या “थैल्या” भरुन आणतात.आणि दामदुप्पटीत छोटे किराणा दुकाणदार,फळभाजीवाले, बेकरी,हाॅटेल चालक यांना सर्रासपणे विकताना दिसतात.यामुळे यावर योग्य ती कार्यवाही करणारी यंञणा अस्तित्वात आहे का नाही ? हा प्रश्न प्लास्टिक विक्रीचा सुळसुळाट बघून अनेकांना पडला आहे.ग्राहकांनी जर एखादी वस्तू घेतली तर सर्रासपणे कमी जाडीच्या कॅरीबॅग दिली जाते.व या कॅरिबॅग जागोजागी पडलेल्या तर कांही ठिकाणी यांचा ढिग साचल्याचे दिसुन येते.तसेच पावसाळ्यात कांही गटारीही तुंबतात.व या पिशव्यामुळे गुरांचे आरोग्य धोक्यात आले असुन पर्यावरणाचा -हास होत आहे.. प्लास्टिक वापरणा-यावर कार्यवाही करण्याचा कायदा हा फक्त महानगर, न.पं.व न.पा.या सारख्या शहराच्या ठिकाणीच आहे.म्हने.हाळी-हंडरगुळी सारख्या ग्रामिण भागात नाही.म्हणुन तर येथील अनेकजण कॅरिबॅगचा धंदा जोमात व खुलेआमपणे करतात.व आठवडी बाजार रविवार या दिवशी तर बाहेर गावचे कांही विक्रेते येथील बाजारात सर्रासपणे कॅरीबॅग विकत असतात.गावातील व परगावातील कांही व्यापारी दिनदहाडे कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्री करत असल्यामुळे नावातच आहे बंदी आणि प्रत्यक्षात माञ कॅरीबॅग विक्रेते यांची होत आहे आर्थीक चांदी.असे म्हणणे चुक ठरणार नाही.तरी मुक्या पशु,पक्षांचे आरोग्य धोक्यात घालुन स्व:ताचे खिसे भरणा-या प्लास्टिक विक्रेत्यांवर कार्यवाही करायचे धैर्य , हिंम्मत संबंधित अधिका-यानी त्वरीत दाखवावी.आम्ही कॅरिबॅग विक्रेत्यांचे दूकाण व गोडाऊन दाखवुन देणार . अशी चर्चा हंडरगुळीतील कांहीजण करताना ऐकू येत आहे.तेंव्हा संबंधित अधिकारी कॅरीबॅग विक्रेत्यांवर धाड टाकण्याचे धाडस दाखविणार कधी? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे..

