उपरा कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते प्रदान
नांदेड प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
नांदेड : अशोक कुबडे लिखित ‘गोंडर’या कादंबरीला बाबुराव बागुल उत्कृष्ट कादंबरी या अतिशय सन्मानाचा पुरस्कार ‘उपरा’ कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मानव विकास संशोधन संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनात हा पुरस्कार अशोक कुबडे यांना कुसुम सभागृह नांदेड येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने हे होते.तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कथाकार, तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर हे होते. स्वागताध्यक्ष मीनल ताई खतगावकर तर निमंत्रक म्हणून संगीता डक होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम,प्रा.दत्ता भगत, माधवराव पाटील शेळगावकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास कदम यांनी केले तर या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक राज गोडबोले कोंडदेव हटकर डाॅ.माधव बसवंते आदी होते.

